Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पाहा, आयपीएस कृष्णप्रकाश यांचा 'लुंगी डान्स'

खेळाडूवृत्ती आणि नृत्याची आवड काल शिर्डीत बघायला मिळाली. शिर्डीत रविवारी आंतरारष्ट्रीय मँरेथाँन घेण्यात आली. 

पाहा, आयपीएस कृष्णप्रकाश यांचा 'लुंगी डान्स'

शिर्डी : एरवी कडक शिस्तीचे ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्यातील खेळाडूवृत्ती आणि नृत्याची आवड काल शिर्डीत बघायला मिळाली. शिर्डीत रविवारी आंतरारष्ट्रीय मँरेथाँन घेण्यात आली. 

21 किलोमीटर मँरेथाँनमध्ये भाग

मॅरेथॉनच्या आयोजनात अहमदनगरचे माजी पोलीस अधीक्षक आणि सध्या व्हीआयपी सुरक्षाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या कृष्ण प्रकाशांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतः 21 किलोमीटर मँरेथाँनमध्ये भाग घेतला होता. 

‘लुंगी डान्स’वर नृत्यकारांसमवेत ठेका

मँरेथाँन संपल्यानंतर थकलेल्या स्पर्धकांचा ताण कमी करण्यासाठी आयोजकांनी डिजेवर गाणी वाजवली.  यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षित नृत्यकार गाण्यावर नृत्य करीत होते. प्रेक्षक त्याचा आनंद घेत होते. 

व्यासपीठावर धाव घेत डान्स

‘लुंगी डान्स’ हे गाणे सुरु होताच तेथे उपस्थित असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी व्यासपीठावर धाव घेतली. त्यानंतर ‘लुंगी डान्स’वर नृत्यकारांसमवेत ठेका धरला. 

Read More