Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा केला पराभव

अहमदनगरमध्ये(Ahmednagar) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. सर्वत्र इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंच्या विजयाची चर्चा रंगली आहे.

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा केला पराभव

Indurikar Maharaj Mother in Law : प्रसिद्ध  किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासू(Indurikar Maharaj Mother in Law ) सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अहमदनगरमध्ये(Ahmednagar) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. सर्वत्र इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंच्या विजयाची चर्चा रंगली आहे.  संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंचायतीत( (Nilwande Gram Panchayat)) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणती विजय मिळवत त्या थेट सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.  विखे पाटील आणि थोरातांच्या गटाला शह देत इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

हिंगोलीतही सासु सुनेच्या लढतीची चर्चा

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातही सासु सुनेच्या लढतीची चांगलीच चर्चा रंगली होती. येथील हाताळा ग्रामपंचायतची निवडणुकीत सासु आणि सुनेमध्ये लढत झाली. या निवडणुकीकडे अवघ्या हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतमोजणी मध्ये शोभाबाई धामणकर यांनी 571 मते मिळवत सुनेचा पराभव केला आहे.  शोभाबाई धामणकर यांच्या सुनबाई दहा वर्ष सरपंच होत्या. सुनबाईचा  शोभाबाई धामणकर यांनी पराभव केला. वृद्ध सासूबाईंनी विजय मिळऊन सास तो सास होती है, ही म्हण खरी ठरविली आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज नेहमी चर्चेत? ( Who is Indurikar Maharaj? ) 

ग्रामपंचायत निवडणुकीत घराघरातून उमेद्वार उभे केले जातात. इंदोरीकर महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार आहेत.  आपल्या मिश्किल अंदाजात इंदोरीकर महाराज कीर्त सांगतात. इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे मुळ गाव आहे.  गावाच्या नावावरूनच त्यांना 'इंदोरीकर महाराज' असं नाव पडलं.

इंदोरीकर महाराज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार असून ते आपल्या किर्तानातून समाज प्रबोधन करतात. इंदोरीकर यांच्या कीर्तानाचे छोटे क्लिप सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात. अनेक जण त्यांच्या किर्तीनाच्या क्लीपवर मिमीक्री देखील करतात. कीर्तनासह इंदोरीकर महाराज हे वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. 

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे घराघरात फुट

भाऊ-बहिण, सासू-सून, बाप-लेक,  माय-लेक तर नवरा बायको यांनी देखील एकमेकांविरोधात निवडणुक लढवली. यामुळे ग्रापंचायत निवडणुकीत घराघरात फुट पडल्याचे चित्र पहयाला मिळाले. यावेळ आणखी एक वेगळी लढत पहायला मिळाली म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटात. कारण, कुणाचा मुलगा शिंदे गटात तर बाप ठाकरे गटात अशा प्रकारच्याही लढती पहायला मिळाल्या. 

 

Read More