Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अबब... पुण्यातल्या वाहनांची संख्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल

  दुचाकींचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये वाहनांची संख्या झपाट्यानं वाढतेय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमध्ये पुण्यातील वाहनसंख्या पुण्याच्या लोकसंख्ये इतकीचं किंबहुना त्यापेक्षाही अधिक दिसून आलीय.

अबब... पुण्यातल्या वाहनांची संख्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे :  दुचाकींचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये वाहनांची संख्या झपाट्यानं वाढतेय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमध्ये पुण्यातील वाहनसंख्या पुण्याच्या लोकसंख्ये इतकीचं किंबहुना त्यापेक्षाही अधिक दिसून आलीय.

वाहनवाढीचा देशातला सर्वाधिक वेग पुण्यात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे पुणेकरांना स्वतःच्या वाहनावर अवलंबून राहावं लागत आहे. 

आरटीओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार... 

- पुणे शहरात एकूण वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० एवढी आहे

- त्यात २७ लाख ३ हजार १४७ दुचाकी 

- तर ६ लाख ४५ हजार ६८३ चार चाकी आहेत

- रिक्षांची संख्या ५३ हजार २२७

- तर टॅक्सी कॅबची संख्या २८ हजार ३४४ एवढी आहे

- शहरात ३८ हजार ५९८ ट्रक आहेत

२०१७ च्या तुलनेत शहरात २ लाख ८९ हजार ९१० इतक्या वाहनांची भर पडली. शहराची लोकसंख्या ३५ लाख तर वाहनांची संख्या ३६ लाख असा प्रकार इथे घडलाय. 

या प्रकारामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्या सुटता सुटत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणं अतिशय निकडीचं बनलंय. 

Read More