Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती

Metro 12 Kalyan to Taloja Project in Marathi : कल्याण, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या भागांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासोबत जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रोला गती देण्यात येणार आहे. या मार्गाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. 

Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो 12 च्या कामालाही गती मिळणार आहे. मेट्रो 12 चे काम जलद गतीने सुरू असून या मार्गाचे आज (3 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. 

ठाणे ते कल्याण वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त आणि जलद प्रवासासाठी सातत्याने नवनवीन प्रकल्पांना प्राधान्य देतात. मुंबईसह ठाणे पल्याडची कल्याण, डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे लवकरच या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ठाणे –भिवंडी–कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण–डोंबिवली–तळोजा मेट्रो 12 हा मार्ग महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 

अशी आहे मेट्रो 12

कल्याण तळोजा ही मेट्रो मार्गिका ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो मार्गिकेला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते तळोजा हे कल्याणमार्गे अंतर सहजरित्या कापता येणार आहे. हा मार्ग एकूण 20.75  किलोमीटरलांबीचा यात 17 मेट्रो स्थानके असणार आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासूनहा मार्ग सुरू होणार आहे. तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीणभागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक आहे. या मार्गामुळे शहरी भागासहग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे. 

प्रकल्पाची सद्यःस्थिती

मेट्रो मार्ग 12 (कल्याण – तळोजा) या प्रकल्पाच्या स्थापत्य व प्रणाली कामाच्या देखरेखीसाठी सामान्य सल्लागार म्हणून मे. SYSTRA S.A- DB Engineering & Consulting GmbH या संस्थेची नेमणूक दिनांक 07 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आली आहे.
मेट्रो मार्ग 12 साठी M/s. LKT Engineering Consultant Ltd. In JV with M/s. Enia Design Pvt. Ltd यांची सविस्तर संकल्पचित्र सल्लागार (DDC) म्हणून दिनांक 06 ऑक्टोबर 2023 रोजी नेमणूक करण्यात आली आहे.
​3. स्थापत्य कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून नियुक्तीची प्रक्रिया प्रगती पथावर आहे.

प्रकल्पाचे फायदे

● वाहतुकीच्या वेळेत होणारी बचत : 45 मिनिटे (कल्याण-तळोजा).
● ठाणे-भिवंडी-कल्याण आणि नवी मुंबई मेट्रो मार्गासह मेट्रो मार्ग 12 चे एकत्रीकरण, ज्यामुळे मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होईल आणि प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येईल.. 
● मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे मोठ्या संख्येने लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
● मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे गुंतवणूक आकर्षित करून आणि मेट्रो स्थानकांभोवती व्यावसायिक आणि रिअल इस्टेट विकासाला चालना देऊन आर्थिक वाढीस चालना देऊ शकते.
● मुंबई मेट्रो मार्ग 12 वाहतुकीचा एक सुरक्षित आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करेल, ज्यामुळे रस्त्यावरील प्रवासाशी संबंधित अपघातांचा धोका कमी होईल. हे रहिवासी आणि अभ्यागतांसाठी गतिशीलता वाढवू शकते.
● प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे वाहनांच्या संख्येत घट झाल्याने रस्ते बांधणी आणि देखभाल याचा खर्च कमी होईल.
● मुंबई मेट्रो मार्ग 12 सुरू केल्याने लोकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करून, रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकते आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.
● अधिक लोक त्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून मेट्रोची निवड करत असल्याने, इंधनाच्या वापरात घट होईल, ज्यामुळे हरित वायू (Greenhouse Gases) उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल.
● मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे वायू प्रदूषण कमी होईल, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर न करता इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड मेट्रो गाड्यांकडे वळल्याने वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते, ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला फायदा होईल.
● मुंबई मेट्रो मार्ग 12 च्या उपलब्धतेमुळे, बसेस आणि ऑटो रिक्षांची वाहनांच्या संख्येत घट होऊ शकते, ज्यामुळे रस्त्यांवर कमी गर्दी होईल आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारेल व प्रवाश्यांना उत्तम आरामदायी व्यवस्था मिळेल, त्यामुळे जीवनाचा दर्जा सुधारेल.

सदर मार्गिका ही सिडको व एमआयडीसी क्षेत्रातून जात असल्याने या क्षेत्रांना भविष्यातील प्रगतीला वाव मिळेल.  
या मार्गिकेचा उद्देश मुंबई शहर आणि त्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील विकास कामांना गती देणे आहे.
⁠ही मार्गिका इतर 13 मार्गिकांशी आणि नवी मुंबई मेट्रोशी जोडली जाणार असल्याने तळोजाहून दक्षिण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, विरार असा कुठेही प्रवास मेट्रो नेटवर्क ने करण सोप होईल.

ठळक वैशिष्ट्ये

• मेट्रो मार्गाची एकूण लांबी: 22.173 कि. मी. (उन्नत).
• एकूण स्थानके: 19 स्थानके (उन्नत).
• प्रकल्प पूर्णत्वाची किंमत: 5,865 कोटी
• दैनंदिन प्रवासी संख्या: 2.62 लक्ष (2031-2032) 2.94 लक्ष (2041-2042)
• प्रकल्प पूर्णत्वाची वेळ: ऑक्टोबर, 2025

Read More