Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'झी 24 तास'चा दणका | एका दिवसात CNG चे दर 10 रुपयांनी कमी

नागपुरात पुन्हा एकदा सीएनजीचे दर खाली आले आहे. नागपुरात मंगळवारी सीएनजी 120 रुपयांपर्यंत वाढले होते. आज पुन्हा नागपुरात सीएनजीचे दर दहा रुपयांनी खाली आले आहे. आज सीएनजी 110 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

'झी 24 तास'चा दणका | एका दिवसात CNG चे दर 10 रुपयांनी कमी

 नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा सीएनजीचे दर खाली आले आहे. नागपुरात मंगळवारी सीएनजी 120 रुपयांपर्यंत वाढले होते. आज पुन्हा नागपुरात सीएनजीचे दर दहा रुपयांनी खाली आले आहे. आज सीएनजी 110 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

नागपुरात सीएनजीचे वितरण करणाऱ्या रॉमेट कंपनीच्या पंपावरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की सीएनजीच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असून कमी दरात सीएनजी उपलब्ध होत असल्यामुळे दर कमी केले गेले आहे.

दरम्यान वाहनचालकांचा दरातील अशा चढ उतारावर विश्वास नाही. एका दिवसात वाढ आणि पुन्हा दर खाली आणणे ही प्रक्रिया विश्वासार्ह वाटत नाही असं वाहनचालकांचे म्हणणं आहे. यासंदर्भात सरकारने काहीतरी नियम करावे असे मत अनेक वाहनचालकांनी व्यक्त केले आहे.

तीन दिवसांपूर्वी 100  रुपये किलो दराने नागपुरात मिळणारे cng  सोमवारी 120 रुपये झाले . पेट्रोल पेक्षा महाग झालेले आणि देशातील सर्वाधिक दराने 120 रुपये किलो दराने नागपुरात cng मिळत असल्याची बातमी 'झी 24 तासा'ने प्रसिद्ध केली होती. यावर ग्राहकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. नागपुरात cng वितरण करणाऱ्या कंपनीने आता 110  रुपये दर केले आहेत.

Read More