Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

चिंताजनक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सर्वाधिक रुग्ण कुठे?

राज्यातील (Maharashtra Corona Update) कोरोना रुग्णसंख्येत आज वाढ झाली आहे.

चिंताजनक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सर्वाधिक रुग्ण कुठे?

मुंबई : राज्यासाठी (Maharashtra Corona Update) चिंताजनक बातमी आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रात आज एकूण 9 हजार 489 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. (In Maharashtra today 3 July 2021 9 thousand 489 corona positive patients found)  

गेल्या  24 तासांमध्ये 8 हजार 395 रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 45 हजार 315 कोरोना बाधित बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96 टक्के इतके झाले आहे.

राज्याचा मृत्यूदर कायम आहे. कोरोनामुळे दिवसभरात 153 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 6 लाख  32 हजार 949 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत.  तर 4 हजार 422 व्यक्ती हे संस्थातमक विलिगीकरणात आहेत. 

मुंबईतील रुग्णसंख्येत घट

राज्याच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असताना मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 575 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा  96 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या  8 हजार 297 सक्रीय रुग्णांवर उपचार केले जात आहे.

कोल्हापुराची आकडेवारी चिंताजनक  

कोल्हापूरमधील आकड्याने चिंता वाढवली आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात सर्वाधिक  1 हजार 289 तर  शहरात 376 असे एकूण 1 हजार 665 रुग्णांची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Assembly Monsoon session 2021 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाचा कार्यक्रम रद्द

मुंबईनंतर 'या' शहरात बोगस लसीकरण, गुन्हा दाखल

Read More