Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तौत्के आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी वादळ धडकणार, राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात उ आंध्र प्रदेश/द ओरीसा किनारपट्टीकडे सरकत आहे. 

तौत्के आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी वादळ धडकणार, राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई: तौत्के आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी एक वादळ धडकणार आहे. या वादळाचा थेट परिणाम होणार नसला तरी अप्रत्यक्षपणे अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळामुळे अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातही पुढे दोन दिवस महत्त्वाचे असणार आहेत. 

गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात उ आंध्र प्रदेश/द ओरीसा किनारपट्टीकडे सरकत आहे. आज मध्यरात्री पर्यंत कलिंगपट्नम,गोपालपूरमध्ये धडकण्याची शक्यता
राज्यासाठी IMD ने पुढच्या 3 ते 4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आह

हवामान विभागाने दिलेलेल्या माहितीनुसार पुढचे 2 ते 3 दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा,मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची तीव्रता जास्त असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, चंद्रपुरात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज आणि यलो अलर्ज देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील "गुलाब चक्रिवाद़ळ" गोपालपूर- १४०कि मी, कलिंगपटनम पासून १९०कि मी असून, आज मध्यरात्री पर्यंत ते गोपालपूर-कलिंगपटनम मध्ये धडकण्याची शक्यता. वाऱ्यांचा वेग ताशी ७५-८५कि मी,व गस्टींग ताशी 95कि मी असेल अशी माहिती कुलाबा वेधशाळेतील शुभांगी भुते यांनी दिली आहे.

27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा आणि 28 तारखेला मध्य महाराष्ट्रात,कोकणात मुसळधार ते अतिमूसळधार पावसाची शक्यता. वारे वेगाने वाहतील,नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 

Read More