Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राजकारण्यांना कंटाळून पॅनेल उभं करत 30 वर्षांचा इतिहास बदलला; इगतपुरीत तरुणांचा विजय

Igatpuri Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी बऱ्याच वर्षांनंतर सत्ता बदल झाला आहे. इगतपुरीत देखील तरुणांनी मोठं यश मिळवलं आहे.

राजकारण्यांना कंटाळून पॅनेल उभं करत 30 वर्षांचा इतिहास बदलला; इगतपुरीत तरुणांचा विजय

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : सध्याच्या तरुणाईचं राजकारणाविषयी फारसं काही चांगलं मत नाही. राजकारणात येण्यासाठी देखील तरुणाईला रस नाही. राजकारण्यांचा मात्र मतांसाठी तरुणाईवर नेहमीच डोळा राहिलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारण सध्या चर्चेचा विषय बनलाय तो कोणता नेता नक्की कोणत्या गटात आहे? पण हे सगळं पटकन ओळखणं सामान्य नागरिकांना अवघड जातय. याच सर्व राजकारणाला कंटाळत नाशिकमधल्या काही तरुणांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं ठरवलं. ग्रामपंचायत निवडणुकीत उतरत या तरुणांनी विजय देखील मिळवला आहे.

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली होती. रविवारी या ग्रामपंचाय निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. इगतपुरीमध्ये देखील काही तरुणांनी प्रस्थापितांना धक्का देत त्याचं पॅनल निवडून आणलं आहे.

इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व तरुणांनी एकत्र येत नवोदय पॅनलची स्थापना केली होती. विशेष म्हणजे एकूण 7 पैकी 4 जागांवर त्यांच्या पॅनलचे सदस्य निवडून आले आहेत. तसेच सरपंचपदी आत्माराम नामदेव सारुकते हे भरघोस मतांनी निवडूणही आले आहेत. गावात 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच असा बदल झाला असून गावचा विकास करण्यासोबतच सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं विजयी उमेदवारांनी आश्वासन दिलय.

भाजपला एकाही जागेवर विजय नाही

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गटालाही इथे चांगलाच धक्का बसला असून या दोन्ही गटाला मागे टाकत काँग्रेसने तीन जागांवर बाजी मारली आहे. तर मनसेने दोन जागांवर खाते उघडले आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे इतर सर्व पक्षांना मागे टाकत चार अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले आहेत.

 निवडूण आलेले सरपंच -

1   ओंडली - प्रकाश वाळू खडके - शिंदे गट

2   दौडत - पांडू मामा शिंदे - काँग्रेस

3   कृष्ण नगर -  वैशाली सचिन आंबावणे - अपक्ष

4   कुशेगाव- एकनाथ गुलाब कातोरे -  अपक्ष

5   मोगरे - प्रताब विठ्ठल जाखेरे - मनसे 

6   लक्ष्मी नगर - सावित्री सोमनाथ जोशी - ठाकरे गट

7   घोटी खुर्द - माणिक निवृत्ती बिन्नर - काँग्रेस (पोट निवडणूक)

8   आडवंन - निकिता किशोर आघान - काँग्रेस

9   धारगाव - रेश्मा पांडुरंग पुंजरा - अपक्ष

10 नागोसली - काशिनाथ साखरू होले - शिंदे गट

11 उंबरकोन - आत्मराम नामदेव सारुकते - अपक्ष

12 सोमज - जिजाबाई काशिनाथ कुंदे - मनसे

13 टाकी घोटी - माधुरी आडोळे - ठाकरे गट

14 शिरसाठे - सुनीता दत्तू सदगीर - शरद पवार गट

15 मोडाळे - शिल्पा दत्तू आहेर - अजित पवार गट

16 नांदगाव सदो - अनिता राक्षे - ठाकरे गट (बिनविरोध)

Read More