Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भर सभेत अजित पवार म्हणाले,.. घंटा ...

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि अनोख्या शैलीसाठी परिचित आहे.  

भर सभेत अजित पवार म्हणाले,.. घंटा ...

बारामती : बारामतीतल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चांगलीच टोलेबाजी केली. बारामतीत आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आजच्या दादांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आता गाडी घसरायला लागलीय.

मंत्री दत्ता भरणे यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून इंदापूर तालुक्‍यात सर्वाधिक निधी दिला जातो. बारामतीला निधी मिळावा म्हणून आम्हालाच मामांना विनंती करावी लागते.

बांधकामाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण, त्यांना माहीत नाही. राज्याच्या तिजाेरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार, नाही तर काय देणार घंटा..? असं म्हणत त्यांची जीभ घसरली. 

पण, झाली चूक त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यावर लगेच सावरासावर करत... 'आता गाडी घसरायला लागलीय, असं म्हणत त्यांनी आपलं भाषण आटोपत घेतले.  

Read More