Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'सीबीएससी'चा बारावीचा निकाल जाहीर,पाहा तुमचा निकाल

सीबीएसईचं संकेतस्थळ, विविध अॅप्स आणि एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत.

'सीबीएससी'चा बारावीचा निकाल जाहीर,पाहा तुमचा निकाल

मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसईचे १२वीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. निकाल पाहण्यासाठी सीबीएसईचं संकेतस्थळ, विविध अॅप्स आणि एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. मात्र परीक्षा मंडळानं निकालाची निश्चित वेळ जाहीर केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळपासूनच वेबसाईट आणि अॅप उघडून बसावं लागणार आहे. सीबीएसई डॉट एनआयसी डॉट इन आणि सीबीएसईरिझल्ट्स डॉट एनआयसी डॉट इन या मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल दिसतील. अँड्रॉईड, मायक्रोसॉफ्ट आणि आयएसओ सिस्टिमच्या मोबाईलमध्ये विविध अॅप्सद्वारेही निकाल पाहता येतील. 

Read More