Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

उच्चभ्रू वस्तीत कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर, क्राईम ब्रांचची कारवाई

 कॅफेच्या (Cafe ) नावाखाली हुक्का पार्लर (Hookah Parlor) चालविण्यात येत होता.  

उच्चभ्रू वस्तीत कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर, क्राईम ब्रांचची कारवाई

कल्याण : कॅफेच्या (Cafe ) नावाखाली हुक्का पार्लर (Hookah Parlor) चालविण्यात येत होता. क्राईम ब्रांचने (Crime Branch Action) उच्चभ्रू वस्तीतील हुक्का पार्लरवर धडक कारवाई केली. कल्याण पश्चिमेकडील निक्की नगर या उच्चभ्रू वस्तीत चसका कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू होता. कल्याण (Kalyan) क्राईम ब्रँचने ((Crime Branch) रात्री अकराच्या सुमारास या हुक्का पार्लरवर छापा घातला. 

या छाप्या दरम्यान १०० हून अधिक तरुण-तरुणी याठिकाणी हुक्क्याच्या नशेत असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ ग्राहकांसह कॅफे मालक व कर्मचारी अशा १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच हुक्क्यासह इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.

Read More