Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मी मुख्यमंत्री झालो तर...संतोष बांगरांनी पोलिसांना आधीच दिले 'हे' आश्वासन

Santosh Bangar: संतोष बांगर यांनी श्रावण मासानिमित्त कळमनुरी येथून कावड यात्रा काढली होती. येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या यात्रेदरम्यान संतोष बांगर यांनी एक विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे. 

मी मुख्यमंत्री झालो तर...संतोष बांगरांनी पोलिसांना आधीच दिले 'हे' आश्वासन

Santosh Bangar: शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी अनेकदा खुल्या मंचावर स्पष्टपण हे बोलूनही दाखवले आहे.  शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते देखील मंत्रिपदाच्या शर्यातीत आहेत. दरम्यान त्यांचे एक विधान सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहे. 

संतोष बांगर यांनी श्रावण मासानिमित्त कळमनुरी येथून कावड यात्रा काढली होती. येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या यात्रेदरम्यान संतोष बांगर यांनी एक विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे. 

मी जर कधी मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना भगव्या टोप्या घालू असे वक्तव्य करीत खळबळ माजवून दिली. आमदार झालेल्या बांगर यांची मंत्री पदाची मनीषा काय झाकून राहिली नव्हती. आता बांगर यांनी मुख्यमंत्री होण्याची ही इच्छा बोलून दाखविल्याने राजकीय पटलावर सनसनाटी पसरली आहे. 

संतोष बांगर नेमके काय म्हणाले?

कावड यात्रेदरम्यान संतोष बांगर एका टेम्पोच्या छतावर उभे होते. रस्त्यावर त्यांचे शेकोडो कार्यकर्ते चालत होते. मध्येच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत होता. यावेळी जमलेल्या गर्दीला ते माईकवरुन संबोधित करत होते. काही काळजी करु नका. एखाद्या वेळेस मुख्यमंत्री झालो तर सर्वांना भगव्या टोप्या घालू, असे विधान त्यांनी पोलिसांना उद्देशून केले. पोरांनो हा मस्करीचा विषय आहे, असेदेखील ते पुढे म्हणाले.

हातात तलवार घेऊन फिरवली

आमदार संतोष बांगर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवत असल्याचे दिसत आहे. यावरुन आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी ही तलवार हातात घेऊन फिरवत होते. 

Read More