Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सांगलीतील वारणा धरण आणि चांदोली परिसरात अतिवृष्टी

धरण परिसरात गेल्या २४ तासांत दीडशे मिलीमीटर पाऊस 

सांगलीतील वारणा धरण आणि चांदोली परिसरात अतिवृष्टी

सांगली : सांगली जिल्ह्यातील वारणा धरण आणि चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली आहे. वारणा धरण परिसरात गेल्या २४ तासांत दीडशे मिलीमीटर पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे काखे-मांगले आणि कोकरुड-रेठरे पूल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे वारणा नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

काखे-मांगले आणि कोकरुड-रेठरे पूल पाण्याखाली गेला असल्याने शिराळा तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत दोन टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. सांगलीत कृष्णा नदीतील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

Read More