Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुढच्या ४८ तासात राज्याच्या या भागांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

जूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

पुढच्या ४८ तासात राज्याच्या या भागांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : जूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पुढच्या ४८ तासात म्हणजेच ३ जुलै आणि ४ जुलैला संपूर्ण कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने मुंबई आणि कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

पुढच्या २४ तासात ठाणे पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडेल, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४८ तासामध्ये पावसाचा जोर अजून वाढण्याची शक्यता आहे. 

जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, पण जुलै महिन्यात कोकण आणि महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असंही कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. 

Read More