Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आर्वी गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाची उदासीनता

Kadam Hospital abortion case: आर्वी  गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाची उदासीनता  दिसून येत आहे. 

आर्वी गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाची उदासीनता

वर्धा :  Kadam Hospital abortion case: आर्वी  गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाची उदासीनता  दिसून येत आहे. 48 तास उलटूनही वैद्यकीय विभागाकडूनही फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान, रुग्णालयात बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावल्याच पोलिसांच्या तपासात समोर आहे.

गेल्या 24 तासापासून कदम हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी सुरुच आहे, अशी पोलिसांनी माहिती दिली.  या प्रकरणात आतापर्यंत या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात डॉक्टर रेखा कदम, दोन परिचारिकेसह मुलाचे आई वडील अटकेत आहेत.

कदम हॉस्पिटलच्या तपासणीसाठी आज फॉरेन्सिक टीम  दवाखान्यात जाणार असल्याची शक्यता आहे. आज नव्याने आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या कदम रुग्णालयच्या  परिचारिका संगीता काळे आणि पूजा दहाट यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी  ठोठावली आहे.

कदम हॉस्पिटलमधील गर्भपात केंद्राच्या संचालिका डॉ. शैलजा कदम यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. डॉ. शैलजा कदम यांना गुरुवारी चौकशी करिता बोलावले होते. पोलिसांनी मात्र प्रकृती बिघडल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन घरी पाठवले. लवकरच डॉ. शैलजा कदम यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 काय आहे नक्की प्रकरण?

वर्ध्याच्या आर्वीमध्ये 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्याच प्रकरण उघड झालं आहे. कदम हॉस्पिटलमध्ये (  Kadam Hospital) हा सगळा प्रकार सुरू होता. 30 हजार रुपयांत कदम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता पोलिसांच्या हाती आणखी धक्कादायक माहिती लागली. पोलिसांच्या तपासात हॉस्पीटलच्या गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या आणि अर्भकाच्या हाडांचे 54 तुकडे सापडले होते.

Read More