Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दुर्देवी! जीवाची बाजी लावून तिघांना वाचवलं, पण नियतीने त्याचाच जीव घेतला

पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यशस्वी ठरला, पण धाप लागली आणि तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दुर्देवी! जीवाची बाजी लावून तिघांना वाचवलं, पण नियतीने त्याचाच जीव घेतला

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात 'तो' यशस्वी ठरला. पण काठावर येईपर्यंत त्याला धाप लागली आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना घडली आहे अहमदनगरमध्ये. मयूर परदेशी असं या धाडसी तरुणाचं नाव असून त्याच्या मृत्यूने अहमदनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

अहमदनगर शहरातील 14 ते 15 तरुण विळद घाट इथल्या गवळीवाडा इथल्या धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात पोहत असताना यातील तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडू लागले. यावेळी तिथे असलेल्या मयूर परदेशी या तरुणाने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि दोघांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढलं. पण तिसऱ्या तरुणाला पाण्याबाहेर आणताना मयुरला धाप लागली आणि तो स्वत:च पाण्यात बुडाला.

रुग्णालयात आणण्यापूर्वीच मयूरचा मृत्यू

मयुरला पाण्यात बुडताना पाहून इतरांनी आरडाओरडा केला. त्याच्या मित्रांनी त्याला त्याला पाण्यातून बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत मयुरचा मृत्यू झाला होता. 

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तीन तरुणांना वाचवणाऱ्या मयुरच्या मृत्यूने अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Read More