Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मंडप सजला, वऱ्हाडी पोहोचले पण लग्नाचा बार उडणार इतक्यात पोलिसांसोबत तरुणी पोहोचले आणि अन् पुढच्याच क्षणी...

Ahmednagar Love Affairs News: लग्नाचा सोहळा सर्वत्र आनंदाचं वातावरण, गुरुजीने शुभमंगल सावधान म्हटलं तेवढ्यात लग्न मंडपात पोलिसांसोबत तरुणीची एन्ट्री होते आणि अन् मग..

मंडप सजला, वऱ्हाडी पोहोचले पण लग्नाचा बार उडणार इतक्यात पोलिसांसोबत तरुणी पोहोचले आणि अन् पुढच्याच क्षणी...

Ahmednagar Crime News: लग्नाचा मंडप सजला वऱ्हाडी, मित्रमंडळी, वधू वरांसोबत विहीनबाई पण मोठ्या उत्साहात असतात. गुरुजी लग्नाच्या विधीची स्टेजवर तयारी करत असता. वधू वराला स्टेजवर बोलविण्यात येतं. नवरा नवरी मोठ्या उत्साहात स्टेजवर येतात. गुरुजी मंगलाष्टकाला सुरुवात करतात 'शुभमंगल..सावधान..' हे स्वर कानावर पडणार तोच लग्नमंडपात गोंधळ उडाला. वधू वरापासून वऱ्हाडांच्या चेहऱ्यावरील आनंद पळाला. 

लग्नमंडपात पोलिसांसोबत एका तरुणीने एन्ट्री घेता क्षणीच नवरदेवाचा चेहरा पांढरा पडला. पोलिसांना लग्नमंडपात पाहून वऱ्हाडीही शॉकमध्ये गेले. पोलिसांचं असं अचानक येणं सगळ्यांना कोड्यात टाकणार होतं. 

लव्ह, सेक्स अन् धोका!

झालं असं की, पोलिसांसोबत आलेल्या तरुणीने वराबद्दल तक्रार केली होती. वराने तिच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचं वचन दिलं होतं. तेवढंच नाही तर तिच्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध पण ठेवले होते. पण अचानक त्या गायब झाला आणि लग्नमंडपात उभा राहिला. त्यामुळे तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिने पोलिसांकडे फसवणूक आणि शारीरिक अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. 

लग्नमंडपात वराच्या वेषातच त्याला...

तरुणीच्या तक्ररावरून पोलिसांनी लग्नमंडपात एन्ट्री केली आणि वराला स्टेजवरुन धरुन पोलीस ठाण्यात आणलं. या घटनेनंतर लग्नमंडपातील आनंदावर विरजण लागलं. वराचं हे कृत्य ऐकून वधूच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्यावर विश्वास ठेवून नवीन आयुष्याला सुरुवात करणार तोच होणाऱ्या नवऱ्याकडून विश्वासघात होतो. (groom love Affairs Girlfriend came to the wedding hall with ahmednagar police Sex Aur Dhokha case)

कुठली आहे घटना?

ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहता या गावातील आहे. पंकज असं या तरुणाचं नाव आहे. त्याचं लग्न नाशिकमधील तरुणीशी ठरलं होतं. दरम्यान पोलिसांनी पंकजविरोधात कलम 376 आणि 420 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याशिवाय आता गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. नवरदेव पंकज सध्या नाशिक पोलीस ठाण्यात कैद आहे. 

Read More