Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती

कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या? 
 

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि डॉ. विकास आमटे (Dr Vikas Amte) यांची मुलगी डॉ. शीतल आमटे (Dr Sheetal Amte) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. तर ही आत्महत्या नक्की कशी झाली यावर सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली. त्यांना ५ इंजेक्शन मागवले होते. त्यापैकी एक इंजेक्शन त्यांच्या मृतदेहाबाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडलं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तर कुत्र्यांच्या इंजेक्शनमुळे माणसाचा मृत्यू होतो का, तो किती प्रमाणात घ्यायला हवा, शीतल यांच्या व्हिसेरा अहवालात इंजेक्शनचे अंश सापडतात का? या सर्व गोष्टींचा तपास आता सुरू आहे. डॉ. शीतल आमटे या आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. 

 गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती आमटे कुटुंबीयांनी नुकतीच दिली होती. या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे हे हेमलकसा प्रकल्पात गेले होते. त्यावेळी शीतल या आपल्या खोलीत एकट्याच होत्या. त्याचवेळी हा प्रकार घडला. 

Read More