Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Govt Job: डीआरडीओमध्ये नोकरी, 67 हजारांपर्यंत पगार, लेखी परीक्षेविना होईल निवड

Government Job: डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

Govt Job: डीआरडीओमध्ये नोकरी, 67 हजारांपर्यंत पगार, लेखी परीक्षेविना होईल निवड

Government Job: सरकारी नोकरी म्हणजे चांगला पगार आणि सुरक्षेची हमी असे अनेकजण मानतात. त्यामुळे शिक्षण सुरु असतानाच अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. असे असले तरी अनेकांना लेखी परीक्षेची भीती वाटते. त्यामुळे काहीजण सरकारी नोकरीचे अर्जच भरत नाहीत. तुम्हीदेखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटची पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता. वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

ज्युनिअर रिसर्च फेलो

ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/एमई/एमटेक/एमएससी मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 37 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

रिसर्च असिस्टंट 

रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीएचडी पदवी पूर्ण केलेली असावी. किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किंवा एमई/एमटेक पदवी आणि संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. रिसर्च असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 67 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

28 वर्षे वय असलेले उमेदवार ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. 

अनेकांना या पदांसाठी अर्ज करायचा असतो पण त्याची प्रक्रिया माहिती नसते. ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. DRDO ची अधिकृत वेबसाइट https://drdo.gov.in/ वर जा.करिअर" टॅबवर क्लिक करा. आता ज्युनिअर रिसर्च फेलो किंवा रिसर्च असिस्टंट यापैकी तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे ते निवडा. यापुढे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा. हे करताना तुम्हाला सर्वात आधी स्वत:ची नोंदणी करावी लागेल. यासाठी येथे न्यू युजर म्हणून पर्याय दिसेल.

कशी कराल नोंदणी?

येथे नोंदणी करताना तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि इतर माहिती भरावी लागेल. नोंदणी केल्यावर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. हा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुमची शैक्षणिक पात्रता आणि इतर माहितीसह अर्ज पूर्ण भरा. तुमच्याकडे मागण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

आता तुम्हाला यासाठी अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. प्रिंट आऊट काढा. ही प्रिंट आऊट तुम्हाला ऑफलाइन माध्यमातून पाठवावी लागेल. 

कुठे पाठवाल अर्ज?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज द ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अरमामेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट आर्मामेंट पोस्ट. पुणे- 411021 येथे पाठवावा लागेल. DRDO ची अधिकृ वेबसाइट drdo.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Read More