मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांच्या कामाचे तास आता कमी केले आहे. ज्यामुळे आता महिला पोलिसांना 12 तास नाही, तर 8 तास काम करावे लागणार आहे. राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी शुक्रवारी म्हणजे आज यासंदर्भात माहिती दिली.
सध्या पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांना 12 तास ड्युटी करावी लागत आहे. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात. कधीकधी त्यांना सणांच्या दिवशी देखील आपल्या कर्तव्याचे पालन करावे लागतात.
तर काही वेळा गंभीर परिस्थितीत त्यांना तास 12 पेक्षा जास्त जातात काम करावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या घरात आणि बाहेर दोन्ही पार पाडणे खूप कठीण होते.
या सगळ्याचा विचार करुन महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे महिला पोलिसांना कुटुंब आणि नोकरीमध्ये समतोल राखणे सोपे झाले आहे.
ही बातमी महिला पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे.
Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours: Maharashtra DGP Sanjay Pandey
— ANI (@ANI) September 24, 2021
(File pic) pic.twitter.com/boa7jUJVtY
या निर्णयाबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. डीजीपी संजय पांडे यांचे ट्विट रिट्विट करताना सुप्रिया सुळे यांनी आपले ट्विट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, यामुळे महाराष्ट्रातील महिला पोलिसांना घरातील आणि बाहेरील जबाबदाऱ्यांचे समन्वय साधणे सोपे होईल.