Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

गोंदिया जि.प.निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार भाजपाच्या मदतीनं अध्यक्षपदी

एकीकडे सुनील तटकरे आघाडीची भाषा करत असताना गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला धक्का दिलाय. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाच्या मदतीनं आपला अध्यक्ष निवडून आणलाय. 

गोंदिया जि.प.निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार भाजपाच्या मदतीनं अध्यक्षपदी

गोंदिया : एकीकडे सुनील तटकरे आघाडीची भाषा करत असताना गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला धक्का दिलाय. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाच्या मदतीनं आपला अध्यक्ष निवडून आणलाय. 

कॉंग्रेस-भाजपची युती

जिल्हा परिषदेत 53 पैकी राष्ट्रवादीकडे 20 जागा आहेत. भाजपाकडे 17 आणि काँग्रेसकडे 16 मतं आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीसाठी चर्चा सुरू होती. मात्र अखेरीस भाजपाची साथ घेऊन काँग्रेसच्या सीमा मढवी अध्यक्षपदी निवडून आल्यात. तर उपाध्यक्षपदी भाजपाचे अल्ताफ शेख यांची वर्णी लागलीये. 

भंडा-यात कॉंगेस-राष्ट्रवादीची आघाडी

भंडारा जिल्हा परिषदेत मात्र कॉंगेस-राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिलीये. काँग्रसचे रमेश डोंगरे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे नंदू कुरजेकर उपाध्यक्षपदी निवडून आलेत. गोंदियामध्ये भाजपासोबत झालेली युती हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. 

गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टोकाचे वाद असल्यामुळे हे घडलंय. मात्र आपण काँग्रेस-भाजपा युतीतबाबत अवहाल मागवला असून त्यावर कारवाई केली जाईल, असंही चव्हाण म्हणालेत.

Read More