Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोरोनामुळे गोदावरी गौरव पुरस्कार स्थगित

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची घोषणा

कोरोनामुळे गोदावरी गौरव पुरस्कार स्थगित

नाशिक : कोरोना व्हायरसचा फटका गोदावरी गौरव पुरस्कारालाही बसला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून मानाचा गोदावरी गौरव पुरस्कार दिला जातो 

१० मार्चला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार होता. मात्र, गर्दीचा प्रसंग टाळण्यासाठी प्रतिष्ठानने हा निर्णय घेतला आहे.

मानाचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे बघितलं जातं. मोठे पुरस्कार यावेळी दिले जातात. मात्र कोरोनाचा वाढता धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक लहान, वृद्धही येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने हा खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आयोजित होणाऱ्या यात्रांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात मोठ्याप्रमाणावर लोक एकत्र जमणार नाहीत, याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी लोकांना मेळावे आणि यात्रांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या राज्यभरातील यात्रा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्दी- खोलका असल्यास त्याची योग्य ती काळजी घेत उपचार करणं, वारंवार हात स्वच्छ धुणं, टिश्यू पेपरची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं असे प्राथमिक उपाय सुचवण्यात आले आहेत. 

 

  

Read More