Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मराठा आरक्षणाबाबत गौतमी पाटीलचे मोठे व्यक्तव्य; कुणबी प्रमाणपत्राबाबतही केले भाष्य

गौतमी पाटीलने मराठा आरक्षणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने कुणबी प्रमाणपत्राबाबत देखील भाष्य केले आहे. 

मराठा आरक्षणाबाबत गौतमी पाटीलचे मोठे व्यक्तव्य; कुणबी प्रमाणपत्राबाबतही केले भाष्य

Gautami Patil On Maratha Aarakshan : मराठा आरक्षावरुन राज्यात गदारोळ माजला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणावरुन नेत्यांमध्ये देखील मतभेद निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच नृत्यांगणा गौतमी पाटील हिने मराठा आरक्षाबाबत मोठे व्यक्तव्य केले आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रा देण्याबाबतही गैतमीने भाष्य केले आहे. 

मराठ्या कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर, मनोज जरांगे यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. तर, मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच असे आश्वासन सरकारने मनोज जरांगे यांना दिले आहे. मराठ्या कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगेच यांच्या या मागणीला गौतमी पाटीलने पाठिंबा दिला आहे. 

मराठा आरक्षाबाबत नेमकं काय म्हमाळी गौतमी पाटील?

मराठा समाजाला आरक्षण मिळेलच पाहिजे असं म्हणत गौतमीने जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.  साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळेलच पाहिजे. मला देखील आरक्षण पाहिजे.  मला देखील कुणबी प्रमाणपत्र पाहिजे असं गौतमी म्हणाली. कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती असं देखील गौतमी म्हणाली. 

आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत

मराठा आरक्षणाबाबत सरकारपुढे पेच निर्माण झालाय. सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेबाबतचा निकाल अद्याप न आल्याने आरक्षणप्रश्नी विधिमंडळातील चर्चेत कोणत्या निर्णयाची घोषणा करायच ? हा पेच सरकारपुढे निर्माण झालाय...मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विधिमंडळात चर्चेची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह याचिकेवर निर्णय देताना खुल्या न्यायालयात सुनावणीची मागणी मान्य केली, तर त्याला काही महिने लागतील. जरांगे यांनी आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिलीय. सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या अशी मागणी जरांगेंची आहे. मात्र, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय सरकार स्वतंत्र आरक्षण देऊ शकणार नाही...त्यामुळे विधिमंडळात चर्चा कोणत्या मुद्द्यांवर करायची? हा मुद्दा असून सरकारला कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी करण्यासाठी जात असताना सकल मराठा बांधवांचा 8 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे मृत्यू झाला. मयत युवकाचं नाव बालाजी पाटील जाधव असं आहे. आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबास 6 लाख 75 हजार रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात आली.

 

 

Read More