Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, सहा जण जखमी

अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलंय.  

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, सहा जण जखमी

मुरूड : मुरूड शहरातील चिखलपाखाडी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सहाजण जखमी झालेत. जखमींना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुरुड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलंय. 

परिसर हादरला 

चिखलपाखाडी इथं राहणारे अजित जोशी यांच्या घरी रात्री त्यांची पत्नी स्वयंपाकाची तयारी करीत होती. त्यावेळी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिलेंडरमधून गळती सुरू झाली आणि आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये अजित जोशी यांच्यासह त्यांची पत्नी, आई, २ मुलं गंभीर जखमी झालेत. या स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून गेला. आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली.

स्फोटाची घटना कळताच मुरुड पोलीस आणि मुरुड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आटोक्यात आणली.

Read More