Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आठवडा झाला तरी औरंगाबादच्या कचऱ्याची कोंडी कायम

आठवडा उलटला तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न कायम आहे. शहरातल्या रस्त्यांवर २५०० टन कचरा पडलाय. त्याची विल्हेवाट कशी लावावी या प्रश्नाचे उत्तर महापालिकेला सापडलेले नाही.

आठवडा झाला तरी औरंगाबादच्या कचऱ्याची कोंडी कायम

औरंगाबाद : आठवडा उलटला तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न कायम आहे. शहरातल्या रस्त्यांवर २५०० टन कचरा पडलाय. त्याची विल्हेवाट कशी लावावी या प्रश्नाचे उत्तर महापालिकेला सापडलेले नाही.

नारेगाव ग्रामस्थांची काढणार समजूत

दरम्यान, या प्रश्नावर गुरुवारी औरंगाबादचे पालकमंत्री दीपक सावंत, महापौर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यात विरोध करणाऱ्या नारेगाव ग्रामस्थांची पुन्हा एकदा समजूत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दीपक सावंत नारेगावच्या नागरिकांची भेट घेणार आहेत. 

कचरा प्रश्न सोडविण्यासाठी हवेय मुदत

कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी चार महिन्यांचा अवधी द्यावा, अशी विनंती केली जाणार आहे. चार महिन्यांत कचरा डेपो रिकामा करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय. तर गावकरी मात्र तडजोडीच्या तयारीत नाहीत, त्यामुळं यातून काय मार्ग निघतो, याची उत्सुकता आहे.  

मुख्यमंत्री भेटीत तोडगा नाही!

दरम्यान, मुंबईत महापौर आणि पालिका आयुक्त यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, यावेळी कचऱ्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे औरंगाबादचा कचरा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Read More