Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Ganpati Festival 2021 : कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, या प्रवाशांना प्रवेश नाही!

Konkan Railway News : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढत आहे. सध्या गणपती उत्सव (Ganpati Festival 2021) सुरु झाला आहे. तसेच प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.  

Ganpati Festival 2021 : कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, या प्रवाशांना प्रवेश नाही!

मुंबई : Konkan Railway News : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढत आहे. सध्या गणपती उत्सव (Ganpati Festival 2021) सुरु झाला आहे. तसेच प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरक्षण नसलेल्या प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर प्रवेश (Konkan Railway Travel) न देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर बॅरेकेटिंग असणार आहे. आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्टेशनमध्ये प्रवेश नसेल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांच्या काळजीसाठी कोकण रेल्वेने हा महत्वाची निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरक्षण असेल तरच स्टेशनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात आलेल्या गणेशभक्तांचा शनिवारपासून अनेकांचा परतीचा प्रवास सुरू होईल. मात्र ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे आरक्षण आहे, अशाच प्रवाशांनी स्थानकात यावे, आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. 

Read More