Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नंदूरबार अपघातात ४ जण जागीच ठार, तिघांची प्रकृती गंभीर

मनमाड सटाणा अपघातानंतर आणखी एक अपघात झालाय. या अपघातात ४ जण जागीठ ठार तर ११ गंभीर जखमी झालेत. यातील ३ जणांची प्रकृती नाजूक आहे.

नंदूरबार अपघातात ४ जण जागीच ठार, तिघांची प्रकृती गंभीर

नंदूरबार : मनमाड सटाणा अपघातानंतर आणखी एक अपघात झालाय. या अपघातात ४ जण जागीठ ठार तर ११ गंभीर जखमी झालेत. यातील ३ जणांची प्रकृती नाजूक आहे.

शहादा तालुक्यातील म्हसावद- आमोदा रस्त्यावर अॅपे रिक्षा आणि मालवाहतूक करणाऱ्या गाडीत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात ४ जण जागीच ठार तर ११ गंभीर जखमी झालेत. जखमीमध्ये आदिवासी कला पथकातील कलाकारांचा समावेश आहे.

जखमी पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जखमींवर शहादा आणि म्हसावद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Read More