Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अशोक चव्हाण यांच्यानंतर लातुरमधील काँग्रेसचा एका मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra politics : मराठवाड्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. माजी मंत्री, काँग्रस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत  

अशोक चव्हाण यांच्यानंतर लातुरमधील काँग्रेसचा एका मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Basavraj Patil Left Congress : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांनी भाजप पक्षात प्रेवश केला आहे.  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नंतर मराठवाड्यातील आणखी एक काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  माजी मंत्री, काँग्रस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपल्या काँग्रेस सदस्याचा राजीनामा दिला आहे. बसवराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

बसवराज पाटील यांच्याकडून अद्याप पर्यंत पक्षप्रवेशाची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.  समर्थकांकडून  पाटील यांच्या भाजप  प्रवेशाच्या बातमीला दुजोरा देण्यात आाल आहे.  बसवराज पाटील आपल्या समर्थकासह मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

कोण आहेत बसवराज पाटील?

लिंगायत समाजाचे नेते असलेल्या बसवराज पाटील यांचा मराठवाड्यात मोठा दबदबा आहे. बसवराज पाटील हे मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील उमरग्याच्या मुरूमचे रहिवासी आहेत. 2009 आणि 2014 अशा दोन निवडणुकांमध्ये त्यांनी औसा मतदार संघातून निवडणुक लढवली आणि येथून विजयी देखील झाले होते. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रीपद दिले. 2019  मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अभिमन्यू पवार यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. यानंतर बसवराज पाटील यांना काँग्रेसपक्षाने किनारा केला. यामुळेच आदता बसवराज पाटील हे भाजपची वाटेवर असल्याची चर्चा आहे. बसवराज पाटील हे लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्चुक असल्याची माहितीही समोर येत आहे. 

नांदेड महानगरपालिकेच्या 55 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नांदेड महानगरपालिकेच्या 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या माजी नगरसेवकांची अशोक चव्हाणांनी बैठक घेतली. त्यानंतर या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचा गमचा घालून चव्हाणांनी सगळ्यांचं स्वागत केलं. मात्र या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गैरहजर होते. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीनही आमदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. जनतेला विचारूनच निर्णय घेणार असं उत्तर या आमदारांनी दिलंय. त्यामुळे हे मोठे प्रवेश होणार की नाही, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. 

 

Read More