Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आधी नदी पार करायची, मग जंगलात 1 फूट पाण्यातून 2 KM पायपीट; शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास

संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थी अत्यंत धोकादायक प्रवास करत आहेत. यांचा प्रवास पाहून अंगावर काटा येत आहे. 

आधी नदी पार करायची, मग जंगलात 1 फूट पाण्यातून 2 KM पायपीट; शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास

Chhatrapati Sambhajinagar News : एकीकडे जगभरात भारताचा नाव लौकिक वाढल्याचा बाता मारल्या जात असतानाच दुसरीकडे देशाचे भलिष्यच अडचणीत आहे. देशातील नागरीत अद्याप पायाभूत सोई सुविधांपासून वंचित आहेत. महाराष्ट्रात धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून जीवघेणा प्रवास  करावा लागत आहे. संभाजीनगरमधील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत.  

जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून जीवघेणा प्रवास

संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांना जायकवाडीच्या एक किमी बॅकवॉटरमधून सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावर बसून जीवघेणा प्रवास करत शाळा गाठावी लागत आहे.

घनदाट जंगल आणि एक फूट पाण्यातून तब्बल दोन किलोमीटर पायपीट

पाण्यातील मोठे विषारी साप तराफ्याकडे येऊ नये म्हणून ही कोवळी मुले काठीने त्यांना ढकलतात. नदीपात्रातून बाहेर पडल्यानंतर ही मुले घनदाट गवत, एक फूट पाण्यातून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करत शाळा गाठतात. या बिकट वाटेत शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी पाण्यात टाकल्या आहेत. त्यांचाही धोका आहे. एवढ्या संकटाना पार करून मुलांना शाळेत जावे लागते.आणि तेवढेच संकट पार करून पुन्हा घर गाठावं लागत. 

ही पोर आहेत खतरों के खिलाडी

खरतों के खिलाडी या रियालिटी शो मध्ये भाग घेणारे स्पर्धक विविध स्टंट करतात. मात्र, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली जाते. शाळेत जाण्यासाठी या विद्यार्थयांचा रोजचा धोकादायक प्रवास स्टंटपेक्षा कमी नाही. 

लेकरू शाळेतून घरी येई पर्यंत आई बापाच्या जीवाला घोर

लेकरू शाळेतून घरी येई पर्यंत आई बापानं मुलांची चिंता सतावत असते. मात्र, मुलांच्या भविष्या साठी आई वडिलांना नाईलाजास्तव हा धोका पत्करत मुलांना शाळेत पाठवावे लागत आहे. त्यामुळं यातून मार्ग काढण्याची विनंती पालक आणि विद्यार्थी करत आहेत.

भीमा नदीच्या काठाच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी होडीतून जीवघेणा प्रवास

पंढरपूरमधील भीमा नदीच्या काठाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. कान्हापुरीमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी भीमा नदी पार करून माळशिरस तालुक्यातील वाघोली गावात येतात. शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना असा धोकादायक प्रवास करावा लागतोय. मुलांचं शिक्षण बंद पडू नये यासाठी एक महिला होडी चालवण्याची जबाबदारी पार पाडत आहे. कान्हापुरी वाघोली दरम्यानच्या नदीवर पूल उभारण्याची मागणी विद्यार्थ्यी करत आहेत.

Read More