Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कल्याणच्या खडेगोळवली परिसरात जेवण वाटपाच्या श्रेयावरून आजी- माजी नगरसेवक भिडले

दोन गटात झालेल्या राड्यात चार जण जखमी. 

कल्याणच्या खडेगोळवली परिसरात जेवण वाटपाच्या श्रेयावरून आजी- माजी नगरसेवक भिडले

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : लॉकडाऊनच्या काळात गरजू नागरिकांच्या मदतीसाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. मात्र आता या मदतीच्या नावावर राजकीय श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात जेवण वाटण्यावरून आजी माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते आपआपसात भिडल्य़ाची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. 

या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्या आहेत यामध्ये भाजप नगरसेवक विक्रम तरे, नगरसेविका मोनाली तरे आणि माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांच्यासह तीस कार्यकर्त्यांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. या राड्यात दोन्ही गटातील चार जण जखमी झाले आहेत.

Read More