Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोल्हापूर, सांगलीत महापुरानंतर आता रोगराई पसरण्याची भीती

आता साथीच्या रोगाचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

कोल्हापूर, सांगलीत महापुरानंतर आता रोगराई पसरण्याची भीती

सांगली : सांगली, कोल्हापूरमध्ये काय घडलंय, त्याची भीषणता दाखवणारी दृष्य सगळ्यांनीच पाहिली. कित्येक गावांत मेलेल्या जनावरांचा खच पडला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. मेलेली गुरं उचलली तर पंचनामे कसे होणार, नुकसान भरपाई कशी मिळणार, अशी भीती ग्रामस्थांना वाटते आहे. पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपाय सांगितला आहे.

पोलीस पाटील, सरपंचांनी सांगितल्यावर गुरांची नुकसान भरपाई मिळणार आहे. मृत गुरांची विल्हेवाट लावण्याचं काम सरकारी पातळीवर होईलच, पण नुकसान भरपाई मिळणार नाही, या भीतीनं जनावरं तशीच ठेवू नका, त्याचा ग्रामस्थांच्याच आरोग्याला धोका आहे.

कोल्हापूरचा महापुराचा विळखा आता सैल होऊ लागला आहे. शहरातलं पाणी मोठ्या प्रमाणावर ओसरु लागलं आहे. मात्र आता साथीच्या रोगाचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. पूरग्रस्त भागात आता स्वच्छता आणि साथरोग निर्मूलनाचे काम सुरू आहे. स्थलांतरित पूरग्रस्तांसाठीचे मदतकार्य सुरू झालं आहे. आठवडाभर ठप्प झालेलं कोल्हापूरचं जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.

Read More