Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

5 पैसे प्रति किलोचा भाव, संतप्त शेतकऱ्याने कांदा रस्त्यावर फेकला

कांदा उत्पादक शेतकरी संतापला

5 पैसे प्रति किलोचा भाव, संतप्त शेतकऱ्याने कांदा रस्त्यावर फेकला

मुंबई : मुंबई : 5 पैसे किलो गोल्टी कांद्याला भाव मिऴाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा ओतून या शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त केला आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी नितीन मोरे यांच्या दोन नंबर गोल्टी कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 50 रुपये प्रति क्विंटलला म्हणजे 5 पैसे प्रति किलोला भाव जाहीर झाला होता. कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर कांदा ओतून निषेध नोंदवला.

काबाडकष्ट करुन पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या लासलगाव, मनमाड,येवला,चांदवड, नांदगाव यासह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला मिळत असलेल्या भावात पिकावर केलेला खर्च देखील निघत नाही आहे. मेहनतीने पिकवलेला कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

 

Read More