Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Fact Check | पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगफुटीचा धोका?

 ढगफुटीसंदर्भात नेमका काय आहे हा दावा आणि या दाव्यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घेणार आहोत.

Fact Check |  पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगफुटीचा धोका?

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यंदा पुन्हा ढगफुटीचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. ढगफुटीसंदर्भात नेमका काय आहे हा दावा आणि या दाव्यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घेणार आहोत. (Fact Check There is a danger of cloudburst in western Maharashtra and Marathwada again this year)

सध्या सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाचे वेध लागलेत. राज्याच्या ब-याच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊसही पडतोय. अशातच एका इशाऱ्यांन सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकलीय. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यंदा पुन्हा ढगफुटीचा धोका आहे. याबाबतचा इशारा इशारा हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे. राज्यात पावसाचा पॅटर्न दिवसेंदिवस बदलतोय. त्यामुळे पीक नियोजन आणि जल व्यवस्थापनासाठी कृती आराखडा तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय.

ढगफुटीच्या बातमीच्या पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाड्यातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. लोकांच्या जीविताचा प्रश्न असल्यानं याबाबत आयएमडीनं लागलीच स्पष्टीकरण दिलं आहे.

आयएमडीच्या (IMD) सांगण्यानुसार, "सध्यातरी इतक्या लवकर ढगफुटीचा अंदाज कुणालाही देता येणार नाही. आमचे अंदाज शास्त्रीय पद्धतीने असतात. त्यामुळे ज्यांनी ढगफुटीचा दावा केला तो तपासून पाहावा लागेल. पुण्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सध्यातरी या शहराला ढगफुटीचा धोका नाही", असं आयएमडीने स्पष्ट केलंय. गेल्या काही वर्षात मान्सूनचा पॅटर्न बदलतोय. हे जरी खरं असलं तरी प. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होणा-या ढगफुटीचा दावा आयएमडीनं खोडून काढलाय. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. 

संबंधित बातम्या : 

कोरोनाकाळात ड्रग्ज गुन्हेगारांचा उच्छाद, लॉकडाऊनमध्येही नशेचा बाजार जोमात

Read More