Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एक्स्प्रेस, मेल गाड्यांच्या दरवाज्यात बसणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अशी लूट

एक्स्प्रेसच्या तसेच मेल गाड्यांच्या दरवाज्यातील रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारुन मोबाईल चोरी करण्याचा फंडा दिसून येत आहे. 

एक्स्प्रेस, मेल गाड्यांच्या दरवाज्यात बसणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अशी लूट

ठाणे : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतून आणि एक्स्प्रेसच्या तसेच मेल गाड्यांच्या दरवाज्यातील रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारुन मोबाईल चोरी करण्याचा फंडा दिसून येत आहे. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळचा प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंबिवली रेल्वेस्थानका लगत असलेल्या थ्रू आँऊट बोगद्या लगत रेल्वेच्या एच् .टी. पोलच्या बाजूला उभे राहून धिम्या गतीने कसाऱ्याच्या दिशेकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेसच्या दरवाज्यातील  उभे असणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारून मोबाईल चोरीच्या घटनेचा फंडा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सकाळी ७ ते ९ या दरम्यान जाणऱ्या मेल एक्स्प्रेस या धिम्यागतीने जात असल्याने त्याचा फायदा घेत रेल्वे खांबाच्या बाजूला  उभे राहुन दरवाज्यातील प्रवाशांना हातावर काठीचा फटका मारून मोबाईल चोरी केली जाते.

संशयित चोर हा इराणी असावा, असे बोले जाते. या घटनेत रेल्वे प्रवाशांच्या अशा प्रकारामुळे जीवाला धोका होऊ शकतो. तरी रेल्वे पोलीस, स्थानिक पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन संशयिताला ताब्यात घेतले पाहिजे, अद्याप अशा घटना सुरु असल्याने एखाद्या रेल्वे प्रवाशांचा जीव गेल्यावर लोहमार्ग पोलिस जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Read More