Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक, आज ६ जागांसाठी मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक, आज ६ जागांसाठी मतदान

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होतेय. उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातल्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे यांच्यात ही लढत होतेय. या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

राणेंचा पाठींबा 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगडमधून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत होतेय. या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना पाठिंबा दिलाय.

सेना विरूद्ध राष्ट्रवादी 

नाशिकमध्येही शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशीच लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे. परभणी हिंगोलीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत लढत होतेय. शिवसेनेचे विपलव बजोरीया आणि काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यातली ही लढत आहे.
अमरावतीमध्ये भाजपचे राज्यमंत्री प्रविण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरीया यांच्यात सरळ लढत होतेय. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ आणि भाजपचे रामदास अंबटकर आमने सामने आहेत.

Read More