Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Fake CBSE School: राज्यात CBSC च्या 1000 हून जास्त शाळा बोगस! मंत्रालयातून झाली सेटिंग, तुमची मुले या शाळांत शिकताय काय?

Fake CBSE School : बोगस ना हरकत प्रमाणपत्र शाळांवर गुन्हे दाखल करून शाळांची तपासणी करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये घालण्याआधी पालकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी.

Fake CBSE School: राज्यात CBSC च्या 1000 हून जास्त शाळा बोगस! मंत्रालयातून झाली सेटिंग, तुमची मुले या शाळांत शिकताय काय?

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  शिक्षणाचे आपल्या आयुष्यात मोठं महत्त्व आहे. शिक्षणाशिवाय आपलं आयुष्य सुशिक्षित होतच नाही. पण याच शिक्षण क्षेत्रातही आता घोटाळे होत असल्याचे समोर आले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये (Pune News) एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 हून अधिक सीबीएसई इंग्रजी (Fake CBSE School) माध्यमांच्या शाळांमध्ये शासनाचे बनावट प्रमाणपत्र (NOC) आढळून आले आहे. शिक्षण विभागाच्या सुरु वतीने करण्यात आलेल्या चौकशीत पुणे शहर किंवा जिल्हा नव्हे तर राज्यातील अजून 4 सीबीएसई या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शासनाचे बोगस प्रमाणपत्र असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे आता राज्यात  बोगस शाळांचे प्रमाण वाढत असून शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांनी आता त्यांचे शासन मान्यता क्रमांक मोठ्या अक्षरात लावावे आणि पालकांनी देखील सतर्कतेने आपल्या पाल्यांना शासनाच्य मान्यताप्राप्त शाळांमध्ये घालावं, असं आवाहन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे.

पालकांनी सतर्कता दाखवावी - सुरज मांढरे

"शाळा अनधिकृत असू शकते असं कोणालाच वाटू शकत नाही.पण त्या विश्वासाला तडा जाईल असे काम काही लोकांनी केले आहे. शिक्षणाच्या अधिकाराच्या तरतुदींमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की एखादी शाळा जर अनधिकृत असेल तर त्याच्यावर दंडनीय कारवाई करण्यात येते. त्यानुसार आम्ही कारवाई देखील करायला आम्ही सुरवात केली आहे. तसेच यामध्ये गैर शासकीय व्यक्ती आणि शासकीय व्यक्ती मदत करत असतील तर त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. नांदेड मध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहे," असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले.

बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत...

सीबीएसई शाळांना राज्य शासनाची मान्यता घेणे गरजेचे असते. त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली जाते. हे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत झाली असून तब्बल 12 लाख रुपयात घेऊन बोगस प्रमाणपत्र शाळा घेत आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाला याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. पुणे जिल्हा परिषदेमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीत 12 लाख रुपये देऊन सीबीएसई शाळांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

 

अजून 4 शाळांचे प्रमाणपत्र बोगस...

हा घोटाळा इथच थांबला नाहीये तर हा घोटाळा मोठा असून यात अनेक मोठ्या माशांचा हात असल्याचे बोलले जात आहे. सध्या या प्रकरणी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचा यात समावेश आहे. पुण्यातील एम. पी. इंटरन्याशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज, शिवाजीनगर , क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज आणि नमो आर आय एम एस इंटरन्याशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज या शाळांची चौकशी सध्या सुरु आहे.त्याच बरोबर मुबई मधील ही शाळा आहेत.आणि आत्ता चौकशीत अजून चार शाळांचे प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे आढळून आले आहे.

अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या...

सीबीएसई शाळांना राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मार्फत हे पत्र मिळत असते. हे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. शाळांचा इनवर्ड नंबर घेऊन त्याआधारे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या असून हे प्रमाण पत्र देण्यात आले आहे. या पत्रासाठी तब्बल १२ लाख रुपये घेण्यात आल्याचे पुढे आले आहे.

या शाळांकडे बोगस ना हकरत प्रमाणत्र

धनिराज इंग्लिश मिडीयम स्कूल दत्तवाडी तालुका मुळशी,(Dhaniraj English Medium School, Dattawadi,Taluka - Mulshi, District- Pune),

ग्लॅडिओलेस इंग्लिश मिडीयम स्कूल ( Gladiolus English Medium School, Ektanagar, Chakan, Tal- Khed, District -Pune) 

नेऊरोन लॅब्स स्कूल  ( Neuron Labs School, Behind Vitthal Mandir Dhanori- Lohegaon, Pune) 

एस.एस.वी.एस.एस ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल (S.S.V.S.S. Orchid the International School, Plot No. 3/3A, RSC, Opp Shri Darshan Society, Shimpoli Road, Gorai-1, Borivali West, Maharashtra)

Read More