Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचा 'पोपट' रोज बोलतोय ना!

Devendra Fadnavis on Nawab Malik allegations :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांचा चांगलाच समाचार घेतला.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचा 'पोपट' रोज बोलतोय ना!

नागपूर : Devendra Fadnavis on Nawab Malik allegations :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांचा चांगलाच समाचार घेतला. मलिक दिवसभर बोलत असतात त्यांना दुसरे काम नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आणखी काही नावे उघड करण्याचे संकेत नवाब मलिक यांनी दिलेत. तसेच हिवाळी अधिवेशनात मोठी नावे समोर येतील, असे मलिक यांनी यावेळी म्हणाले. यावर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, राष्ट्रवादीचा 'पोपट' रोज बोलतोय ना! 

गेले काही दिवस दररोज पत्रकार परिषदा घेत नवाब मलिक यांनी NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्याचवेळी भाजपवरही जोरदार टीका करत आहेत. ड्रग्ज पार्टी प्रकरणातील काही माहिती हिवाळी अधिवेशनात समोर आणणार आहे की ज्यामुळे भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा रहाणार नाही, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी भाजपावर केला.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी टाळले आहे.  ते दिवसभर काहीतरी बोलत असतात, आता सध्या त्यांना दुसरे कामे नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही, असे सांगत मलिक यांनी केलेल्या आरोपांना महत्व देत नसल्याचे एक प्रकारे फडणवीस यांनी दाखवले. तर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत या मलिक यांच्या आरोपांवर मात्र कोणाचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली आहे.  

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्याच्यामुळे कोण कोणाचा पोपट आहे? तुमच्या करता हे महत्त्वाचे असेल आमच्याकरिता नाही , अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली .

Read More