Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

डॉ.शीतल आमटे आत्महत्या : पोलीस तपासात पुढे काय झालं ?

 डॉ.शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश 

डॉ.शीतल आमटे आत्महत्या : पोलीस तपासात पुढे काय झालं ?

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि डॉ. विकास आमटे (Dr Vikas Amte) यांची मुलगी डॉ. शीतल आमटे (Dr Sheetal Amte) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.  ही आत्महत्या नक्की कशी झाली यावर सध्या तपास सुरू आहे. याप्रकरणी आता नवी माहिती समोर येत आहे. स्वर्गीय डॉ.शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आले. 

टॅबला असलेला डोळ्यांचा पासवर्ड क्रॅक न करता आल्यामुळे आता ही जबाबदारी पुणे येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरिटी (central forensic science laboratory) कडे सोपविली होती. यासोबतच डॉ. शीतल यांच्या लॅपटॉप आणि 2 मोबाईलचा पूर्ण डेटा देखील रिकव्हर झाला नसल्याची चंद्रपुर पोलिसांना शंका आहे. 

डॉ.शीतल आमटे यांचे 2 मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब Central forensic science laboratory कडे देण्यात आले. या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधल्या माहितीतूनच डॉ. शीतल यांच्या आत्महत्येमागील कारणांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. 

कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली. त्यांना ५ इंजेक्शन मागवले होते. त्यापैकी एक इंजेक्शन त्यांच्या मृतदेहाबाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती आमटे कुटुंबीयांनी दिली होती. या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे हे हेमलकसा प्रकल्पात गेले होते. त्यावेळी शीतल या आपल्या खोलीत एकट्याच होत्या. त्याचवेळी हा प्रकार घडला. 

Read More