Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरे अस करू शकत नाही : दुकानदार

तो नियमित आपल्या एकनिष्ठेने काम करत होता असा विश्वासही दुकान मालक दिलीपकुमार साबु यांनी व्यक्त केला

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरे अस करू शकत नाही : दुकानदार

औरंगाबाद: दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेला सचिन अंदुरे असं करू शकत नाही, असा विश्वास तो काम करत असलेल्या दुकानाचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय. सचिन निराला बाजार येथील दुकानात गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता. तो नियमित आपल्या एकनिष्ठेने काम करत होता असा विश्वासही दुकान मालक दिलीपकुमार साबु यांनी व्यक्त केला तर सचिनच्या अटकेने धक्का बसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

सचिन अंदुरे यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली - सीबीआय

दरम्यान, सचिन अंदुरे यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) रविवारी करण्यात आला. सीबीआय आणि एटीएसने शनिवारी औरंगाबादमध्ये संयुक्तरित्या कारवाई करत  सचिन अंदुरेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज त्याला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

 अंदुरेला रसद पुरवणाऱ्यांचाही शोध घेणे गरजेचे - सीबीआय वकिल

सचिन अंदुरेनेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली. त्याने विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते. त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात आणखी तपास करावा लागेल. तसेच अंदुरेला रसद पुरवणाऱ्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत अंदुरेला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा

सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा रहाणारा आहे. २० ऑगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती . अवैध शस्त्रसाठाप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीची देखील दाभोळकरांच्या हत्येत हात असल्याची कबुली चौकशी दरम्यान मिळाली आहे. 

Read More