Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणाची आरोग्य मंत्र्यांकडून गंभीर दखल

रत्नागिरीतल्या ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी आरोग्य सहसंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणाची आरोग्य मंत्र्यांकडून गंभीर दखल

रत्नागिरी : रत्नागिरीतल्या ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी आरोग्य सहसंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ज्ञानदा पोळेकर यांचा पावसकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्वतः दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. 

आठ दिवसात समिती मार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. बालमाता मृत्यू समितीच्या माध्यमातून सुद्धा चौकशी केली जाणार आहेत.

चौकशी रुग्णालय दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिलंय.

पावसकर हॉस्पीटलचा परवाना निलंबीत

प्रसुतीनंतर केवळ सहा दिवसांत रत्नागिरीत बाळंतिणीचा मृत्यू झाला होता. पाच दिवसांपूर्वीच रत्नागिरी शहरातल्या पावसकर हॉस्पिटलमध्ये त्यांची सीझर डिलिव्हरी झाली होती. तीन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुन्हा पावसकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यावेळी तिथं एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. पदरात केवळ सहा दिवसांचे मूल असलेल्या या बाळंतीण मृत्यूप्रकरणी पावसकर हॉस्पिटलवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Read More