Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या

पुण्यात DJ च्या आवाजामुळे दुकांनाचे मोठे नुकसान झाले आहे. DJ च्या आवाजामुळे दुकानांच्या काचा फुटल्या आहेत. 

पुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या

Pune News : पुण्यात डीजेचा दणदणाट पहायला मिळत आहे.  गणपती विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डीजे लावण्यात आल्या. डीजेच्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या आहेत. यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले आहे.  
पुण्याच्या भोरमध्ये डीजेच्या दणदणाटात निघालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान आवाजामुळे अनेकांना त्रास झाला. डीजेच्या दणदणाटामुळे काही दुकानाचे नुकसान झाले आहे. डीजे साऊंडच्या हादऱ्याने दुकानांमधील मांडणीवर ठेवलेल्या काचेच्या बरण्या जमिनीवर पडून फुटल्यानं त्यातील मालाचे नुकसान झाले. तसेच  दुकानांमधील कपाटला असलेल्या शटरच्या काचाही तडे जाऊन फुटल्या आहेत.

शहरांमधील घरांमध्येही डीजेच्या आवाजाचे हादरे बसले आबेत.  डीजेच्या दणदणाटाला नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.  मिरवणुकांमध्ये ढोल ताशा सारख्या पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देऊन, डीजेचा दणदाणाट बंद करावा किंवा डीजे साऊंड सिस्टिमला आवाजाची मर्यादा घालून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

पुण्यातील गणेशभक्तांना दिलासा

पुण्यातील गणपती विसर्जनात ढोल ताशा पथकामध्ये आता 30हून जास्त लोकं सहभागी होऊ शकणार आहेत. याबातच्या याचिकेवर सुनावणी करताना, तसा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान ढोलताशा पथकामध्ये जास्तीत जास्त 30 लोकांनीच सहभागी होण्याचे निर्बंध राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच NGTनं घातले होते. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली. त्यावर सुनावणी दरम्यान ढोलताशा पथकांवरील निर्बंध सुप्रीम कोर्टानं हटवले. तसंच NGTच्या आदेशालाही कोर्टानं स्थगिती दिली. गणेशोत्सव पुणेकरांच्या हदयात बसला आहे. त्यामुळे पुणेकरांना गणेशोत्सव त्यांच्या मनासारखा साजरा करू द्या असे निर्देश, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. 

पुण्यात सणांच्या मिरवणुकांमध्ये बंदी असतानाही लेझर लाईटचा सर्रास वापर करण्यात येतोय. दहीहंडी आणि गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केलीय. 

लेझर लाइटिंगचं साहित्य पुरविणाऱ्या सहा जणांविरुद्ध

पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. तसंच आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारलाय.  आतापर्यंत तीन मंडळांवर गुन्हे दाखल झालेत.तर विसर्जनाच्या दिवशीही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 

Read More