Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बापरे! शिवारातील विहीर खचल्यानं पती- पत्नी ढिगाऱ्याखाली; घटनास्थळाची दृश्य विचलित करणारी

Dhule News : पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतं. पण, धुळ्यात नुकताच घडलेला एक अपघात अनेकांचचा थरकाप उडवून गेला.   

बापरे! शिवारातील विहीर खचल्यानं पती- पत्नी ढिगाऱ्याखाली; घटनास्थळाची दृश्य विचलित करणारी
Updated: Jun 28, 2024, 07:45 AM IST

Dhule News : धुळे जिल्ह्यातील सांगवी शिवारात विहीर ढासळून ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची घटना घडली. शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारात शेतातील विहीर ढासळल्याने पतीसह पत्नी विहिरीच्या ढिगार्‍याखाली दबले गेले. रेबा पावरा आणि मीना पावरा असं या पती-पत्नीचे नाव आहे. 

शेतात विहिरीजवळ काम करत असताना काही कळायच्या आतच, अचानक विहीर ढासळली. क्षणात ढासळलेल्या विहिरीबरोबर रेबा आणि मीना दोघेही खोल विहिरीत जाऊन पडले. विहिरीलगत असलेला मातीचा ढिगारा ढासळल्याने दोघेही ढिगार्‍याखाली दाबले गेले. विहीर खचल्यानंतर एक मोठा आवाज झाला आणि तिथं संतुबाई पावरा नावाच्या महिला दीड वर्षाच्या बाळासह विहीरीपाशी गेल्या तितक्यातच विहीरीचा आणखी एक भाग कोसळून त्याही विहीरीत पडल्या. 

सध्या महिलेसह तिच्या बाळाला वाचवण्यात स्थानिकांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळतात स्थानिक गावकरी आणि प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं बचाव कार्य हाती घेतलं होतं. पण, यामध्ये पावरा दाम्पत्याला वाचवण्यात मात्र यश मिळालं नाही. ज्यामुळं गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला. 

अशीच आणखी एक घटना काळजाचा ठोका चुकवून गेली 

अकोल्यातील गौरक्षण रोड येथील साई बाबा मंदिर परिसरातील विहीर जवळील टाईल्स खचकल्याने दुर्दैवी घटना घडली होती. मंदिर परिसरात असलेल्या विहिरीवर लोखंडी जाळी लावण्यात आली आहे, मात्र शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक योगेश अग्रवाल आणि त्यांनी 3 वर्षाची मुलगी विहिरी जवळील ओट्यावर बसले असताना अचानक टाईल्स खाचकल्या आणि दोन्ही जणं सुमारे 20 फूट खोल विहिरीत पडले होते. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप? 

सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले. सुरुवातीला या बचावकार्यात 3 वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं होत. यानंतर योगेश अग्रवाल यांना बाहेर काढण्यासाठी या विहिरीवरील लोखंडी जाळी कापून शर्थीचे प्रयत्न करून तब्बल 3 तासांनंतर बाहेर काढण्यात यश मिळालं. या घटनेत अग्रवाल यांना दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.