Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जेव्हा राष्ट्रवादीचे माजी खासदार भाजपमध्ये आल्याचंच विसरले, व्हिडिओ व्हायरल

जेव्हा नेते पक्षांतर केल्याचंच विसरतात...

जेव्हा राष्ट्रवादीचे माजी खासदार भाजपमध्ये आल्याचंच विसरले, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत अनेकांनी पक्षांतर केलं. पण ते लक्षात नसल्यानंतर काय होतं ते एका व्हिडिओतून समोर आलंय. कोल्हापूरचे माजी खासदार आणि नुकतेच भाजपवासी झालेले धनंजय महाडिक यांनी कमळाऐवजी घड्याळाला मतदान करा असं म्हटल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. दक्षिण कोल्हापुरातील भाजपचे उमेदवार अमल महाडिकांच्या प्रचारादरम्यान मतदारांना मतदानाचं आवाहन करताना धनंजय महाडिकांकडून अनवधानानं असं वक्तव्य झालं.

विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये आले आहेत. शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळे अनेक जुने नेते आणि कार्यकर्ते नाराज देखील झाले आहेत. युती आणि आघाडी झाल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी देखील पाहायला मिळते आहे. या बंडखोरीचा फटका युती आणि आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Read More