Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखालून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले

सोमवारी सायंकाळी घडली दुर्घटना

महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखालून ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले

मुंबई : महाड इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांनी आपला जीव गमावला आहे. सोमवारी सायंकाळी काजळपूरा भागात असलेल्या 'तारीक गार्डन' असं या इमारतीचं नाव आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली असून, सध्याच्या घडीला ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. 

जवळपास आता या घटनेला २० तास होऊन गेले आहेत. मोहम्मद बागी असं या मुलाचं नाव आहे. ढिगाऱ्याखालून एक मृतदेह काढण्यात आला त्याच्या शेजारी दोन फूटांवर या मुलाचा पाय NDRF जवानांना दिसला. लहान मुलं जिवंत असल्याचं समजताच अवघ्या अडीच मिनिटांत त्या बाळाला ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं. बाहेर आल्यानंतर या मुलाने पहिलं 'अम्मी-अब्बा' असा शब्द उच्चारला. बाहेर काढल्यावर आपण नेमकं कुठे आहोत? काय सुरू आहे? असे प्रश्न त्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसू लागले. या मुलाला सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. मुलाचे वडिल दुबईत कार्यरत असतात. ते लवकरच घटनास्थळी पोहोचतील. मुलाची आई आणि बहिण अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याचं समजतं. 

पाच मजली इमारतीमध्ये २०० ते २५० नागरिक राहत असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. बचावकार्य सुरू आहे.

Read More