Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

स्वाभिमानी संघटनेचे आंदोलक आक्रमक, दूध टॅंकर फोडले

सातारा खंबाटकी घाटात स्वाभिमानी मुंबईकडे जाणारे 19 दूध टँकर फोडले. 

स्वाभिमानी संघटनेचे आंदोलक आक्रमक, दूध टॅंकर  फोडले

सातारा : सातारा खंबाटकी घाटात स्वाभिमानी मुंबईकडे जाणारे 19 दूध टँकर फोडले. आज(ता.17) रोजी आता रात्री 8 वाजता सातारा खंबाटकी घाटात जयसिंगपूर येथून पोलीस संरक्षणात मुंबईकडे निघालेल्या वारणा,गोकुळ, नंदणी दूध संघाचे 19 टँकर 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी फोडले.

वाहतूक ठप्प  

शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलक आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वाढली आहे. सातारा पुणे महामार्गावरही वाहतुक ठप्प झाली आहे. 

बैठक निष्फळ 

दूध आंदोलनावर मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत सरकारला तोडगा काढण्यात अपयश आलं. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांनी म्हणजे १९ जुलैला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत दूध कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

Read More