Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

डहाणू समुद्रात मासेमारांची बोट बुडाली

 आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार मदतीला धावून आल्यानं जीवितहानी टळली.

डहाणू समुद्रात मासेमारांची बोट बुडाली

रायगड: डहाणूच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या बोटीवरील ११ खलाशांचा जीव वाचला आहे. रात्री साडेआठच्या सुमारास ही बोट बुडाली. यावेळी आजूबाजूच्या बोटीवरील मच्छिमार मदतीसाठी धावून आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

धाकटी डहाणू येथील भानुदास गजानन तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट डहाणू बंदरातून ४ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेली होती. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती बुडाली. या वेळी बोटीवर तांडेल यांच्यासह ११ खलाशी होते. आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार मदतीला धावून आल्यानं जीवितहानी टळली.

डहाणू बंदरासमोर सुमारे ३० नॉटिकल खोल समुद्रात हा अपघात घडला. स्थानिक मच्छीमार बोटी या बुडालेल्या बोटीला आणि त्यावरील खलाशांनी घेऊन बंदराकडे येत आहेत.

Read More