Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; मुंबईतील जुहू चौपाटी येथे सहा जण समुद्रात बुडाले

बिपरजॉय चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.  पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; मुंबईतील जुहू चौपाटी येथे  सहा जण समुद्रात बुडाले

Cyclone Biporjoy High Tide : बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. कोकणातील मालवण ते वसई किनारपट्टीवर उंचच उंच लाटा उसळत आहेत. 13 जूनपर्यंत समुद्रकिनारी 3.5 ते 5.1 मीटर उंच लाटा उसळणार आहेत अशी माहिती हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर पहायला मिळाला आहे. मुंबईतील जुहू चौपाटी येथे सहा जण समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. 

समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी

पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने समुद्र किनाऱ्यांवर येत आहेत. अशातच मुंबईतील जुहू चौपाटी या ठिकाणी फिरायला आलेले सहा जण समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.  यामध्ये स्थानिकांनी आतापर्यंत दोन जणांना रेस्क्यू केला आहे. तर, चार जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

गणपतीपुळ्याचे थरारक CCTV फुटेज व्हायरल

रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यात समुद्राला उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. गणपतीपुळ्याचे थरारक CCTV फुटेज व्हायरल जाले आहे. समुद्राच्या पाण्यामुळे काही दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत. या लाटेत अनेक पर्यटक जखमीही झालेत. बिपरजॉय चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं बोललं जातंय. 

पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून मुंबईत धडकणार 

पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून मुंबईत धडकणार आहे. मुंबईत आतापर्यंत 3 ते 4 मीमी पाऊस झाला आहे. मात्र, पुढील 48 तासांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 500 ते 600 किलोमीटरवरुन जात आहे. हे वादळ गुजरातला धडकणार असलं तरी या वादळामुळे मुंबईतही वेगवान वारे वाहत आहेत. मुंबईत वा-यांचा वेग 55 ते 60 किलोमीटर एवढा आहे. 

वसई समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्याचा वेग कायम

अरबी समुद्रात घोंघावात असलेल्या वादळी वाऱ्याचा मोठा पारिणाम वसई समुद्र किनारपट्टीला बसला आहे.  समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील सुरूच्या बागेसह आजूबाजूच्या शेती बागायतींचे नुकसान झालंय. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने सकाळी विश्रांती जरी घेतली असली तरी वादळी वाऱ्याचा वेग कायम आहे.

मुंबईच्या सायन उड्डाण पुलावर या जोरदार वा-यांमुळे दुर्घटना 

बिपरजॉय वादळामुळे मुंबईत जोरदार वारे वाहत आहेत. मुंबईच्या सायन उड्डाण पुलावर या जोरदार वा-यांमुळे दुर्घटना घडलीय. दुपारी दीडच्या सुमारास पुलावरचे लाईटचे दोन खांब कोसळले. पुलावरुन जाणा-या दुचाकीस्वारावर हा खांब कोसळल्यानं तो जखमी झाला. तर, एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला लाईटच्या खांबाचा तळभाग जीर्ण झाला होता. त्यात जोरदार वा-यांमुळे तो पडल्याचं बोललं जातं आहे.

Read More