Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दर मिळत नसल्यानं उभ्या कोथिंबीरमध्ये ट्रॅक्टर फिरवला

मात्र, त्यांच्यावर आता कोथिंबिर नांगरून टाकण्याची वेळ आलीय. 

दर मिळत नसल्यानं उभ्या कोथिंबीरमध्ये ट्रॅक्टर फिरवला

धुळे : धुळे शहराजवळ शेती असलेले सुभाष चौधरी यांच्या शेतात पाणी आहे. कृषी बाजारपेठ जवळ आहे. त्यामुळे ते शेतात भाजीपाल्याचं पीक घेतात. मात्र, त्यांच्यावर आता कोथिंबिर नांगरून टाकण्याची वेळ आलीय. 

उभ्या कोथिंबीरमध्ये ट्रॅक्टर फिरवला

कोथिंबीरीला दर मिळत नसल्यानं त्यांनी उभ्या कोथिंबीरमध्ये ट्रॅक्टर फिरवलाय. चौधरी यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात कोथंबीरची लागवड केली. पीकही जोमानं आलं. 

बहरलेलं पीक जमीनदोस्त 

मात्र बाजारात दोन आणि तीन रुपये किलोने कोथांबीर विकावी लागत असल्यानं काढणीसाठी लागणार खर्चही निघत नसल्यानं, त्यांनी बहरलेलं पीक जमीनदोस्त केलं. दर कमी झाल्याचा फटका फक्त कोथिंबीरीलाच बसलेला नाही तर अन्य भाजीपाल्यांनाही बसलाय.

Read More