Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Dhananjay Munde: राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयातच बोगस भरतीचं रॅकेट, 'या' आमदाराच्या नावाचा वापर

Dhananjay Munde : तुम्ही मंत्रालय लिपीकपदासाठी अर्ज केला असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण मंत्रालयात बोगस भरती (Mantralaya Recruitment Fraud ) झाल्याचं मोठं रॅकेट उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे या भरती प्रकियेत मोठ्या आमदारांचं नाव वापरण्यात आलं आहे.

Dhananjay Munde: राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयातच बोगस भरतीचं रॅकेट, 'या' आमदाराच्या नावाचा वापर

Dhananjay Munde :  मुंबईतून (Mumbai News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीपैकी कोणी मंत्रालयातील लिपीकपदासाठी अर्ज केला असेल तर त्यांनी सावध व्हा. कारण मंत्रालयात बोगस भरती (Mantralaya Recruitment Fraud ) झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयातच मोठ्या आमदार यांचं नाव वापरण्यात आलं आहे. (mumbai Mantralay news)

काय आहे नेमकं प्रकरण?  

राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातलाच कर्मचारी हे बोगस लिपीक भरती रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाचा वापर करुन मंत्रालयात बोगस लिपीक भरती रॅकेट खुलेआम होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला (Mumbai Police) अटक करण्यात आली आहे. गोवंडी पोलिसांनी निखिल माळवेला अटक केलीय तर शुभम मोहिते, निलेश कुरतडकरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. यात बनावट सही शिक्क्यांचा वापर करण्यात आलाय. (Crime news Mantralaya Recruitment Fraud on the name of dhananjay munde Police arrested one accused mumbai news in marathi)

धनंजय मुंडेंकडून स्पष्टीकरण

बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केलीये. या आरोपींचा माझ्या कार्यालयाशी कसलाही सबंध नाही असा खुलासा धनंजय मुंडेंनी केलाय. 

Read More