Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

उच्चशिक्षित ममताने टोकाचं पाऊल का उचललं? वसई-विरार महापालिकेत होणार होती रुजू

कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी ममताने टोकाचं पाऊल उचललं, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

उच्चशिक्षित ममताने टोकाचं पाऊल का उचललं? वसई-विरार महापालिकेत होणार होती रुजू

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, वाडा (Wada) इथं एका उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ममता परशुराम परेड असं या तरुणीचं नाव असून वाडा तालुक्यातील निंबवली इथं ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. अवघ्या 24 वर्षांच्या ममताने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांत (Palghar Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

ममताने नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल
शनिवारी म्हणजे 10 डिसेंबरला परेड कुटुंबांने रात्री एकत्र जेवण केलं, त्यानंतर गप्पा गोष्टी करत ते सर्व जण झोपी गेले. रविवारी पहाटे ममताची आई उठली आणि तिला धक्काच बसला. ममताने घराबाहेर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ममताच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर हा सर्व जवण जागे झाले आणि हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी ममताचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला.

हे ही वाचा : आताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?

ममता उच्चशिक्षित 
ममता परेड ही उच्चशिक्षित (Highly Educated) होती, तीने एमएपर्यंच शिक्षण पूर्ण केलं होतं. सध्या ती स्पर्धा परीक्षेची (competitive exam) तयारी करत होती. याशिवाय तीने पुण्यातून पत्रकारीतेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. विशेष म्हणजे ममताला वसई-विरार महानगरपालिकेत (Vasai-Virar Municipal Corporation) जनसंपर्ख अधिकाऱ्याची (PRO) नोकरी लागली होती. आज म्हणजे 12 डिसेंबरपासूनच ती कामावर रुजू होणार होती. त्यामुळे ममताचं कुटुंबही खूश होतं.

हे ही वाचा : Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?

ममताच्या आत्महत्येने हळहळ
ममता मनमिळावू आणि शांत स्वभावाची असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. ममता गेल्या दोन महिन्यांपासून नैराश्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. एका उच्चशिक्षित तरुणीने कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी अशाप्रकारे आत्महत्या करुन आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाडा पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

Read More